खासदार संजयकाका पाटील यांनी केली जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेची पाहणी


 जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्र. ६ मधून  तलावात सोडलेल्या पाण्याची  प्रत्यक्ष पाहणी खासदार संजयकाका पाटील यांनी केली. या योजनेचा आढावा घेताना त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. म्हैसाळ योजनेचे पाणी पहिल्यांदाच जत कालव्यापासून ७२ किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. डफळापूर तलाव, कुंभारी येथील जलस्वराज्य तलाव, पांडु तलाव, इनाम तलाव, कोसारी लघू पाटबंधारे तलाव क्रमांक १ आणि शेगाव लघू पाटबंधारे  क्रमांक २ हे भरण्यात आले आहेत.   तसेच बनाळी, बनशंकरी येथील तलाव आणि कोळी तलाव यांचीही पाहणी केली.  अंकले येथील पंपहाऊसलाही त्यांनी भेट दिली.  यावेळी सहायक अभियंता अश्विन  कर्नाळे, श्री. मनोज कर्नाळे,  श्री. गणेश अभियंता श्रेणी 2  यांच्याबरोबर इतर कर्मचारी उपस्थित होते .
                                                                                       
  City  News जत,

प्रतिनिधी- सचिन संतीकर 


संपूर्ण बातमी खालील लिंक वर

https://youtu.be/wUHAQpoL9Cs

Comments